लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन
Rupay ATM Card Offers and schemes.... Click here. Tirumala Tirupati Devasthanam Online Booking.... Click here.
अल्प मुदती पिक कर्ज धोरण
उद्देश राज्य शासनाच्या धोरणानुसार अल्प मुदती पिक कर्ज दरात मोठया प्रमाणात वाढ होण्याच्या दृश्टीने जिल्हयातील सहकारी पत संस्थेतील शेतकरी सभासदाच्या शेती व्यवसायाचा विकास करण्यासाठी शेतीमाल उत्पादनासाठी ही कर्ज दिले जातील.
पात्रता शेतकरी ज्या संबंधीत सहकारी संस्थेचे सभासद असेल अशा सहकारी संस्थेमार्फत त्यांनी तयार केलेल्या कमाल कर्ज मर्यादा पत्रकाच्या आधारे शेतकरी सभासद कर्ज मिळण्यास पात्र राहिल.
कर्जाची रक्कम संबंधीत आदिवासी विविध कार्यकारी/सेवा सहकारी संस्थेनी त्या हंगामाकरीता तयार केलेल्या कमाल मर्यादा पत्रकाच्या आधारे व बँकेच्या धोरणातील मंजूर एकरी पिक कर्ज दराप्रमाणे शेतकरी सभासदास कर्ज वाटप केले जाईल.
कर्जाचा कालावधी
अ.क्र. तपशील कर्ज वाटप कालावधी परत फेडीची तारीख
खरीप पिकाकरीता 1.04.20.... ते 30.09.20.... मार्च 20..... शेवटचा शुक्रवार
रब्बी पिकाकरीता 1.10.20.... ते 28.02.20..... मे 20..... शेवटचा शुक्रवार
दुबार पिकाकरीता 1.11.20.... ते 31.01.20.... मार्च 20..... शेवटचा शुक्रवार
व्याजदर
अ.क्र. तपशील बँकेने संस्थेचे कर्जावर आकारावयाचे व्याज द.सा.द.शे. संस्थांनी सभासदाचे कर्जावर आकारावयाचे व्याज द.सा.द.शे. थकीत कर्जावर दंड व्याज
दि. 31.03 पर्यंत चालु कर्जावर 4.00 6.00 -
दि. 01.04 पासून थकीत कर्जावर 9.00 11.00 -
विमा (Insurance) शेतकरी सभासदांसाठी ‘‘राष्ट्रीय कृषी विमा योजना’’ सुरु असुन ही योजना ऐच्छीक आहे.
Processing Fee Nil
आवश्यक कागदपत्रे 1) वैयक्तिक पीक कर्ज मागणी अर्ज बँकेने पुरविलेल्या विहित नमुन्यात.
2) सभासदाचे शेतीचा 7/12 ची प्रत.
3) सभासदाचे शेतीचा गांव नमुना 8‘अ’ ची प्रत.
4) सभासदाचे शेतीच्या 7/12 वर हिस्सेदार असल्यास/सामाईक भागीदार असल्यास रु. 100/- चे स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र.
5) हैसीयत प्रमाणपत्र.
6) नमुना ‘ल’ फॉर्म (‘इ’ करारपत्र)
7) प्रोमिसरी नोट (वचन चिट्ठी)
8) इतर बँकेचे कर्ज नसल्याचे नादेय प्रमाणपत्र.
9) धारण केलेल्या जमिनीवर (7/12) बोझा नोंद.
10) सभासदाचे मतदान ओळखपत्राची झेरॉक्स प्रत.
11) रेशन कार्डची झेरॉक्स प्रत.
12) आधार कार्डची झेरॉक्स प्रत (असल्यास)
जादा अटी 1) संस्थेची कमाल मर्यादा पत्रके मंजुर झाल्याशिवाय कर्ज वाटप केले जाणार नाही.
2) सभासदांना कर्ज वितरण करतांना त्यांचेकडून आवश्यक ती कागदपत्रे (कायदा व पोटनियमानुसार) दाखल करुन घेण्याची जबाबदारी संस्थेची राहिल.
 
Designed by Trust Systems