लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन


गोल्ड तारण कर्ज त्वरित उपलब्ध
निवृत्ती वेतन धारकास मुदतबंद कर्ज धोरण -
अटी व शर्ती :
उद्देश निवृत्ती वेतन धारक कर्जदार सभासदास वैयक्तीक कारणाकरीता.
पात्रता ज्या निवृत्ती वेतन धारकाचे खाते आपल्या बँकेच्या शाखेत आहेत आणि त्यांना दरमहा मिळणारे निवृत्तीवेतन आपल्या बँकेतील शाखेमार्फत होत आहे. असे निवृत्ती वेतन धारक या योजनेत सहभागी होण्यास पात्र राहतील.
कर्जाची रक्कम - निवृत्ती वेतन धारकास मिळणाÚया निव्वळ वेतनाच्या (बँकेत जमा होणाÚया पगाराचे) मासीक समान दहापट किंवा जास्तीत जास्त रु. 3,00,000/- पर्यंत मुदत बंद कर्ज उपलब्ध राहील
कर्जाचा कालावधी निवृत्ती वेतन धारकास कर्ज मंजुरी नंतर कर्ज उपलब्ध केल्यास कर्जाची परतफेड व्याजासह मासीक समान 60 हप्त्यात (5 वर्ष) करावी लागेल.
व्याजदर 1) निवृत्ती वेतन धारकाचे मुदत बंद कर्जाकरीता व्याज द.सा.द.शे. 11.50% राहील.
2) कर्जाचा हप्ता थकीत झाल्यास 1% जादा दंड व्याज आकारण्यात येईल.
विमा (Insurance)  
Processing Fee Nil
आवश्यक कागदपत्रे 1) कर्ज घेणा-या निवृत्ती वेतन धारकास रु. 100/- भरुन बँकेचे नाममात्र सभासद झाले याबाबत तपशील.
2) निवृत्ती वेतन मुदत बंद कर्जाकरीता अर्जदारास कुटुंबातील पत्नीची/पतीची/ मुलाची/मुलीची/भावाची यापैकी दोन जमानतदार द्यावे लागेल. व कर्जदार थकीत झाल्यास अथवा कर्जदाराचा मृत्यू झाल्यास सदर कर्ज परत फेडीची जबाबदारी ते स्विकारीत असल्याबाबतचे हमी करारनामा पत्र रु. 100/- चे स्टॅम्प पेपरवर घ्यावे लागेल.
3) निवृत्त वेतन मुदत बंद कर्ज मागणी अर्ज बँकेने पुरविलेल्या विहीत नमुण्यात असावा.
4) निवृत्ती वेतन मुदत बंद कर्जाकरीता कर्ज घेणा-याच्या पेंशन ऑर्डरच्या झेराक्स प्रत द्यावे लागेल.
5) निवृत्ती वेतन धारकाचे पेन्षन खात्यामधून दरमहा कर्जाची परत फेड किस्त व्याजासह कपात करण्यात येईल. याकरीता पेंशन धारकास संमती पत्र रु. 100/- चे स्टॅम्प पेपरवर.
6) अर्जदारास डिड ऑफ हायपोथीकेशन रु. 100/- च्या स्टॅम्प पेपरवर तसेच कन्टीन्यूटींग गॅरंटी बाँड रु. 100/- च्या स्टॅम्प पेपरवर करुन द्यावा लागेल.
ज्यादा अटी 1) निवृत्ती वेतन धारक गडचिरोली जिल्हयाचा कायम रहिवासी असावा.
2) निवृत्ती वेतन धारकाचे वय 60 वर्षापेक्षा जास्त नसावे. मात्र 67 वर्षानंतर त्याचे अर्ज स्विकारण्यात येणार नाही.
3) निवृत्ती वेतन धारकास कर्जाकरीता स्वतःच्या संपुर्ण स्थायी संपत्तीचे विवरण कर्ज मागणी अर्जात नमुद करावे लागेल. तसेच अर्जदाराच्या बँकेतील ठेवी, ठेवीची प्रमाणपत्रे, विमा पॉलिसी इ. तपशील अर्जासोबत सादर करावा लागेल
Designed by Trust Systems